प्रतिनिधी / पणजी
गोवा फोरवर्डचे दुर्गादास कामत यांनी भाजप कार्यकर्त्यांनी कामगार कल्याण बोर्डचे पैसे खाल्याचा आरोप केला आहे त्याचा आम्ही निषेध करतो. दुर्गादास कामत यांनी कुठल्याच पुराव्याच्या आधाराशिवाय भाजपच्या कार्यकर्त्यावर आरोप केला आहे. पुन्हा असे चुकीचे आरोप केले तर भाजप पक्ष त्याला गप्प बसणार नाही असा ईशारा भाजपचे उत्तर गोवा उपाध्यक्ष प्रशांत देसाई यांनी काल पत्रकार परिषदेत दिला.
गोवा फोरवर्डचे दुर्गादास कामत यांनी कठल्याच पुराव्याशिवाय भाजपवर आरोप केले आहे. बांधकाम क्षेत्रातील कामगारासाठी महिना 6 हजार रुपये ही केंद्र सरकारची rयोजना योग्य त्या कामगारापर्यंत पोहचली आहे. भाजपने आपल्या कार्यकर्त्यांना हे पैसे वाटले नाही. दुर्गादास कामत हे स्वता भ्रष्टाचारी आहे. गोवा फॉरवर्डचे माजी मंत्री विनोद पालयेकर जलस्त्राsत खात्याचे मंत्री होते तेव्हा दुर्गादास कामत हे त्यांचे sओएसडी होते. यावेळी त्यांनी आपले या खात्यात स्वःताचे कॅबिन बांधले होते. यावेळी ते अनेक कंत्राटदाराकडून हफ्ते घेत होते. याचे अनेक पुरावे आमच्याकडे आहे. त्याची योग्य चौकशी सरकारने करावी. ते भ्रष्टाचारी असल्याने त्यांनी अनेक लोकांची कामे अडवून ठेवत होते. त्यामुळे शिवोलीतील नागरीकांनी त्याला हाकलून लावले होते. ते स्वता भ्रष्टाचारी असून निष्ठावंत भाजप कार्यकत्यावर खोटे आरोप करत आहे, असे यावेळी प्रशांत देसाई म्हणाले.
गोवा फोवर्डच पक्ष सध्या सत्तेत नसल्याने त्यांना भाजपवर आरोप करण्याची सवय झाली आहे. सत्तेत नसल्याने त्यांना हफ्ते मिळत नाही. त्यामुळे भाजपवर खोटे आरोप करत आहे. त्यामुळे कुठलेच पुरावे न घेता आरोप करण्यांची त्यांना सवय झाली आहे. जर त्यांनी पुन्हा असे खोट आरोप भाजप कार्यकत्यावर केले तर भाजपचे कार्यकर्ते त्याला योग्य धडा शिकविणार आहे, असेही यावेळी प्रशांत देसाई यांनी सांगितले यावेळी त्यांच्या सोबत भाजपचे गिरीष ऊसकईकर उपस्थित होते.