सांगली/प्रतिनिधी
महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपकडून निरंजन आवटी यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या सूचनेनुसार सर्व सदस्यांशी चर्चा करूनच आवटी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. स्थायी समिती सभापती भाजपचाच होईल, अशी माहिती भाजप गटनेते विनायक सिहंसने यांनी दिली.
यावेळी माजी महापौर संगीता खोत, गीता सुतार, युवराज बावडेकर, गीतांजली ढोपे-पाटील, ऍड. स्वाती शिंदे, राजेंद्र कुंभार, संजय कुलकर्णी, उर्मिला बेलवलकर यांच्यासह भाजपचे अन्य नगरसेवक, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.