ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजपकडून मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय निवडणूक लढवणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
भाजप युवा मोर्चापासून राजकारणाची सुरुवात केलेले संजय उपाध्याय मुंबई भाजपचे सरचिटणीस आहेत. ते भाजपच्या प्रदेश कार्यकारणीवरही होते. उत्तर भारतीयांवर त्यांचा प्रभाव असून, आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता त्यांना राज्यसभेवर पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, उपाध्याय 22 तारखेला सकाळी 11 वाजता राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.