ऑनलाईन टीम / भोपाळ :
भाजपचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपात प्रवेश करण्यासाठी 50 कोटी रुपये आणि मंत्रिपदाची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस नेते उमंग सिंघार यांनी केला आहे.
सिंघार यांनी त्यांच्या धार निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन ज्योतिरादित्य यांच्या ऑफरबद्दल माहिती दिली.सिंघार म्हणाले, ज्योतिरादित्य यांनी मला भाजपची ऑफर दिली आहे. काँग्रेसला भविष्य नाही. तुम्ही भाजपात प्रवेश केला तर तुम्हाला 50 कोटी आणि मंत्रिपद देण्याची तरतूद केली जाईल. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मी यासंदर्भात बोललो आहे, असे मला सांगण्यात आले.
त्यावर मी ज्योतिरादित्य यांना स्पष्टपणे सांगितले की, मी जमुनादेवीजींच्या कुटुंबातला आहे. माझा मार्ग वेगळा आहे. तुमचा मार्ग वेगळा आहे. मी आयुष्यभर तत्त्वांशी लढलो. मी माझी तत्वे सोडू शकत नाही.