सांखळी मतदारसंघात कार्यकर्त्यात जल्लोष
प्रतिनिधी /सांखळी
गोव्यात पुन्हा एकदा भाजपचा सामन्य कार्यकर्ता डॉ प्रमोद सावंत मुख्यमंत्री पद भूषवणार असल्याने सांखळी भाजप कार्यकर्त्यात मतदारसंघात उत्साही वातावरण दिसत असून आज सोमवारी मुख्यमंत्री म्हणून निवड होताच कारकर्त्यासह सामान्य नागरिकांनी शहरात आणि ग्रामीण भागात जल्लोष साजरा केला.परिसरात फटाके लावण्याचे आले, मिटाई वाटण्यात आली.
ग्रामीण भागातील भाजप कार्यकर्ते खुश
सांखळी मतदारसंघातिल ग्रामीण भागातही भाजपचे कार्यकते खुश असून डॉ प्रमोद सावंत मुख्यमंत्री झाल्याने पाळी, वेळगे, सुर्ला, कुडणे, आमोणा, न्हावेली,हरवळे, गावातही कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
सांखळी मतदारसंघातिल लोकं नायक
गेल्या कित्येक वर्षांपासून डॉ प्रमोद सावंत हे सांखळी मतदारसंघात लोकसेवा बजावत असून राज्यात व देशासाठी त्याचे काम महान समजले जात आहे, गोव्यतील जनतेने त्याच्यावर दाखवलेला विश्वास आणि सांखळी तिल जनतेने दिलेला विजय श्री आणि देवावर असलेली श्रद्धा,सामान्य जे÷ नागरिकांचे आशीर्वाद या बळावरच सावंत गोव्याचे पुन्हा मुख्यमंत्री झाले याचा आम्हा सांखळी वासीयांना अभिमान आहे असे मत भाजप कार्यकर्त्या सुविधा धीरज पेडणेकर यांनी या विषयी बोलताना सांगितले.
डॉ सावंत विषयी आम्हला अभिमान आहे : गोपाळ सुर्लकर
केंद्रीय समितीने मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्यावर दाखवलेला विश्वासच आम्हला अभिमान देऊन जातो.गेल्या तीन वर्षांत गोव्यावर अनेक संकटे येऊनही यशस्वी पणे गोव्याचा विकास साधला, डॉ सावंत हे सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेते आहेत.सांखळी मतदारसंघात ही त्यांनी गेल्या दहा वर्षांत विविध समाज उपयोगी उपक्रम राबविले आहेत.एक सामान्य माणूस म्हणून त्याची सांखळी मतदारसंघात ओळख आहे.ते पुन्हा गोव्यात यशस्वी पणे सरकार चालवणार आहेतच सांखळी मतदारसंघात आम्ही विशेष लक्ष देऊ असे मत जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर यांनी व्यक्त केले.
कुडणे, न्हावेली, हरवळे गावात आनंद उत्सव साजरा
सांखळी मतदारसंघात शिमगोत्सव ची धूम सुरू असतानाच भाजपने पुन्हा एकदा डॉ प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्री जाहीर केल्याने कुडणे, न्हावेली, हरवळे गावात आज सोमवारी संध्याकाळी आनंद उत्सव साजरा करण्यात आला. असे माजी सरपंच गुरुप्रसाद नाईक, यांनी या विषयी बोलताना सांगितले.
पुन्हा एकदा युवा मुख्यमंत्र्यांची गरज होती : प्रशांत साधले
गोव्याची अनुभवी आणि शिक्षित युवा मुख्यमंत्र्यांची गरज होती.भाजपने निवडणूक पूर्वी दिलेला मुख्यमंत्री पदाचा चेहरा गोव्यतील जनतेने पसंत केला.अशाच नेत्याची गरज गोव्याला होती.महाराष्ट्र चे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा गोव्याचे निवडणूक प्रभारी झाले तेव्हाच आपण भाजपचा विजय निश्चित धरला होता.आणि मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांची काम करण्याची पध्दत खूपच सुंदर आहे. मात्र आपल्या सिस्टम मध्ये असलेल्या लोकांनी त्यांना चांगले सहकार्य करण्याची गरज आहे असे मत भाजपचे हितचिंतक प्रशांत साधले यांनी व्यक्त केले.