तावडे, मुंडेंना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आज अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जाहीर केली. मागील वर्षी विधानसभेचे तिकीट नाकारण्यात आलेले फडणवीस सरकारमधील तत्कालीन मंत्री विनोद तावडे आणि विधानसभेत पराभव झालेल्या पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय मंत्री म्हणून स्थान देण्यात आले आहे.
डॉ. रमन सिंह, मुकुल रॉय, अन्नपूर्णा देवी, बैजयंत जय पांडा यांची भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भूपेंद्र यादव, कैलाश विजयवर्गीय, सीटी रवी यांची भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली.
विजया रहाटकर आणि सुनील देवधर यांना राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अल्पसंख्याक मोर्चाच्या अध्यक्षपदी नागपूरचे जमाल सिद्दीकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.