ऑनलाईन टीम / जयपूर :
राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यातील धारियावाड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार गौतम लाल मीणा यांचे आज सकाळी निधन झाले. ते 56 वर्षांचे होते.
मीणा यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना उदयपूर येथील एमबी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. मीणा हे धारियावाड विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळा आमदार राहिले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि चार मुले आहेत.