ऑनलाईन टीम / जळगाव :
महाराष्ट्रात वीज बिलाच्या तक्रारींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना महावितरणाने वाढीव बिलाचा शॉक बसला आहे. या यादीत आता भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचाही समावेश झाला आहे.
भाजपा नेते एकनाथ खडसे यांना जळगावमधील मुक्ताईनगर येथील घरामध्ये 1 लाख 4 हजार रुपयांचे बिल लाइट बिल आले आहे. एप्रिल ते जुलै अशा चार महिन्यांचे हे बिल आहे. एकनाथ खडसे यांनी याविषयी आश्चर्य व्यक्त केलं आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी यांनी राज्य सरकारकडे या प्रकरणी चौकशी करावी तसेच बिलात सूट द्यावी अशी मागणी केली आहे.
खडसे म्हणाले की, लॉकडाउनच्या या काळात येणारी वीज बिलं अवास्तव आहेत. महावितरणने अशा पद्दतीने लोकांना वेठीस धरु नये योग्य नसल्याचे ते म्हणाले. यासोबतच सरकारने अवास्तव बिलांची चौकशी केली करावी आणि बिलामध्ये सवलत द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.