ऑनलाईन टीम / जळगाव :
भाजपचे माजी खासदार आणि भाजप जळगाव जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांचे कोरोना आजारामुळे मंगळवारी निधन झाले. ते 71 वर्षांचे होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. जळगावमध्ये असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर 10 दिवसांपूर्वीच त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, आज दुपारी 1वाजता रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दरम्यान, जानेवारी 2020 मध्ये त्यांची जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली होती. याआधी जावळे हे जळगाव जिल्ह्यातील रावेल मतदार संघातून दोन वेळा आमदार व खासदार म्हणून निवडून आले होते. तसेच त्यांनी मधुकर साखर कारखान्याचे चेअरमन पदी भूषविले होते.
हरिभाऊ जावळे यांच्या निधनानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी त्यांना ट्विट करत श्रद्धांजली अर्पण केली.