उमेदवाराला 4 लाख मताधिक्क्मयाने विजयी करा : मुख्य सचिव महेश टेंगिनकाई यांचे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार विजयी होणार हे निश्चित आहे. असे असले तरी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे. निवडणूक केव्हाही जाहीर होऊ शकते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच पक्षाच्या प्रचाराला प्रारंभ करावा. तसेच भाजपच्या उमेदवाराला 4 लाख मताधिक्क्यांनी विजयी केले तरच दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांना खरी श्रध्दांजली ठरेल, असे भावनिक आवाहन राज्य भाजपचे मुख्य सचिव महेश टेंगिनकाई यांनी केले आहे.
हलगा येथील सुवर्ण गार्डन येथे भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले भाजपचा कार्यकर्ता हा भरकटणारा नाही. नेहमीच तो पक्षाशी एकनिष्ठ असतो. तळागाळातील कार्यकर्ते आजपर्यंत काम करत आले आहेत. त्यामुळे त्यांना मोठा अनुभव आहे. लोकसभेची पोटनिवडणूक केव्हाही जाहीर होऊ शकते. त्या दिशेने आता पाऊल उचलणे गरजेचे आहे. असे सांगत महेश टेंगिनकाई यांनी निवडणुकीच्या तयारीत गुंतण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. यावेळी व्यासपीठावर ज्ये÷ वकील एम. बी. जिरली, काडा अध्यक्ष व्ही. आय. पाटील, माजी आमदार जगदीश मेटगुड, राजेंद्र हरकुणी, बुडा अध्यक्ष घुळाप्पा होसमनी, हणमंत कोंगाली, शरद पाटील, उज्ज्वला बडवाण्णाचे, सुभाष पाटील, महेश मोहीते, संदीप देशपांडे, दीपक देशपांडे, युवराज जाधव आदी उपस्थित होते.