ईपीएस 95 पेन्शनर संघटनेच्या बैठकित निर्णय : संघटनेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप
प्रतिनिधी/कोल्हापूर
ईपीएस 95 पेन्शनरच्या मासिक बैठकीत 16 नोव्हेंबरला भाजपचे शहर कार्यालयावर मोर्चाने जाऊन कुलूप लावण्याचा निर्णय घेण्यात आला. संघटनेची पुणे येथे झालेल्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी सांगितले.
संघटनेचे सचिव अनंत कुलकर्णी म्हणाले की, ईपीएस 95 संघटनेच्या अनेक प्रश्नाकडे सत्ताधाऱयांनी दुर्लक्ष केले आहे.संघटनेच्या प्रश्नाबाबत अनेकवेळा रास्ता रोको,रेल रोको,धरणे आशी अनेक आंदोलने करण्यात आली.संघटनेचे जवळपास 70 लाख पेन्शनर आहेत.या पेन्शनरांना तुटपुंजी पेन्शन मिळत आहे. याबाबत आतापासूनच जागृती करण्यासाठी वेळोवेळी प्रचार,प्रसार करण्यात येणार आहे. केंद्रात भाजप पक्ष सत्तेत आहेत. यामुळे सर्व पेन्शनरांचा मोर्चा नोव्हेंबरमध्ये काढण्यात येणार असून भाजपचे कार्यालयाला कुलूप लावण्यात येणार आहे. यावेळी संघटनेचे सचिव अनंत कुलकर्णी, प्रकाश जाधव,पी.टी.रानभरे,वसंत माने, लहू कांबळे यांच्यासह जिल्हÎातून अनेक पेन्शनर या बैठकीला उपस्थित होते.