प्रतिनिधी/ कोल्हापूर
भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी म्हाडाचे माजी अध्यक्ष, शाहू उद्योग समुहाचे प्रमुख समरजीत घाटगे यांची बिनविरोध निवड पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी भरत पाटील यांनी घाटगे यांच्या नावाची घोषणा केली. निवडीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करुन जल्लोष केला. तर प्रदेशाध्यक्ष चंदकांत पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. हॉटेल आयोध्या येथील सांस्कृतिक हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष चंदकांत पाटील, राज्य सरचिटणीस सुरेश हाळवणकर, देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, मावळते अध्यक्ष हिंदुराव शेळके, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक, महामंत्री बाबा देसाई, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिक्कोडे यांच्यासह जिल्हय़ातील बुथ कमिटी प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, उपस्थित होते.महामंत्री बाबा देसाई यांनी निवडणूक प्रक्रियेची माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी समरजीत घाटगे यांचे अध्यक्षपदासाठी नाव सूचवले. त्यास संभाजी आरडे, संदीप पाटील यांनी अनुमोदन दिले. निवडीनंतर मान्यवरांनी समरजीत घाटगे यांना शुभेच्छा दिल्या.
कर्जमाफीसाठी मोर्चा, जाचक अटी रद्द करा- समरजीत घाटगे
भारतीय जनता पार्टीच्या सरकारने शेतकऱयांसाठी अनेक योजना राबविल्या. महापुरामुळे शेतीच्या उत्पादनात घट झाल्याने सरकारने शेतकऱयांना दिलासा देण्यासाठी विना अट कर्जमाफी दिली पाहिजे अशी मागणी भाजपचे नूतन अध्यक्ष समरजीत घाटगे यांनी केली. महिन्याअखेरीस कर्जमाफीसाठी विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी घोषणाही त्यांनी केली. निवडीनंतर ते मेळाव्यात बोलत होते.
ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत नाईलाजास्तव भाजपचा स्कार्प काढून ठेवावा लागला. पण पक्षाने जिल्हाध्यक्षपद देवून माझा सन्माना केला. पक्षाने टाकलेली ही जबाबदारी नेटाने सांभाळली जाईल. वकृत्वा पेक्षा कतृत्वाला प्राधान्य देणार असून कोल्हापूरच्या बुथ कमिटय़ानी केलेल्या कामाची देशभर अमलबजावणी केली जाईल असे काम करुन दाखवू असा विश्वास व्यक्त केला. कानात चाडय़ा सांगणाऱयांची गय केली जाणार नाही. असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी पश्चिम महारष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सुरेश हाळवणकर, शैमिका महाडिव। हिंदुराव शेळके, राहूल चिक्कोडे यांनी मनोगत व्यक्त केले.