ऑनलाईन टीम / मुंबई :
‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकाबाबत भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी आज संध्याकाळपर्यंत भूमिका घेऊन हे पुस्तक अधिकृतपणे मागे घ्यावे, असे आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना केले आहे.
एका आयोजित पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते. राऊत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींशी करणे चुकीचे आहे. शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत आहे. छत्रपतींच्या गादीचे वारस भाजमध्ये आहेत. त्यांना हे मान्य आहे का, हे त्यांनी स्पष्ट करावे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल आदर आहे. मात्र, त्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी होऊ शकत नाही. मोदींना या पुस्तकाबाबत कल्पना नसेलही, त्यांचा या प्रकरणात दोष नाही. मात्र, मोदीचे भक्त त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भाजपच्या राज्यातील नेत्यांनी अधिकृतपणे हे पुस्तक मागे घ्यावे.