अहमदनगर/प्रतिनिधी
आज नगरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज 3 हजार 28 कोटी महामार्गाचे भूमीपूजन तर 1 हजार 46 कोटी लोकार्पण सोहळा होत आहे. यावेळी राजकारणातील पारंपारिक कट्टर विरोधक एकाच मंचावर येणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजप नेते, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) हे आज शनिवारी नगरमधील कार्यक्रमात एकाच मंचावर दिसले. पण कार्यक्रमाच्या आधी चर्चा झाली ती मंत्री हसन मुश्रीफांच्या स्वागताची.
दरम्यान, नागरमध्ये कार्यक्रमाच्या आधी अहमदनगरचे भाजप खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe-Patil Member of the Lok Sabha) यांनी यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांचं जंगी स्वागत केलं. शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वागताला नगरमधील सगळे राजकीय नेते हेलिपॅडवर जमले होते. नेत्यांचे आगमन होताच सुजय विखेंनी मोठ्या उत्साहात सर्वांचे स्वागत केले. पण चर्चा झाली ती हसन मुश्रीफांच्या स्वागताची. नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (minister hasan Mushriff) यांचे आगमन होताच सुजय विखे यांनी मुश्रीफांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले तर आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांना हँडशेक करुन त्यांची खुशाली विचारली.