मित्रही जाळय़ात -कारमध्ये सापडले लाखेंचे कोकेन
कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमधील भाजप युवा मोर्चाच्या पर्यवेक्षक आणि हुगळी जिह्याच्या भाजप महासचिव पामेला गोस्वामी आणि त्यांचा मित्र प्रबीर डे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर बेकायदेशीररीत्या कोकेन बाळगल्याचा आरोप आहे. पोलिसांना काही सूत्रांच्या हवाल्याने याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. यानंतर पोलिसांनी पामेला यांना अटक केली. अमली पदार्थांच्या सध्याच्या किंमतीनुसार जप्त करण्यात आलेले कोकेन हे पाच लाख रुपयांचे आहे. पोलीस सध्या पामेलाची चौकशी करत आहेत.
पामेला गोस्वामी आपल्या सहकाऱयाच्या मदतीने बऱयाच काळापासून अमली पदार्थांच्या विक्री व्यवसायामध्ये सामील असल्याचा सुगावा पोलिसांना लागला होता. त्यानुसार पोलिसांच्या एका विशेष पथकाने त्यांच्या वाहनताफ्याचा पाठलाग करून त्यांची गाडी अडवली. चौकशीदरम्यान त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या कार आणि बॅगेची तपासणी केली असता त्यांना कोकेन सापडले. पोलिसांनी न्यू अलीपुर येथे रस्त्यावरच पामेला यांची गाडी अडवून तपासणी केली. यानंतर त्यांच्या बॅग आणि कारमध्ये 100 ग्रॅम कोकेन सापडले. कोकेनसोबत इतर अमली पदार्थही सापडल्याचे बोलले जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पामेला मागील बऱयाच काळापासून अमली पदार्थांच्या तस्करीमध्येही सहभागी होत्या. पोलिसांना काही सूत्रांच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकण्यात आला. तेव्हा पामेला यांच्याकडे अमली पदार्थ सापडले. विशेष म्हणजे पामेला राजकारणामध्ये सक्रीय असल्याने तिला सुरक्षाही पुरवण्यात आली होती. या अटकेच्या वेळीही त्यांच्यासोबत सुरक्षारक्षक होता.