मुंबई : उत्तर प्रदेशसह 5 राज्यांमध्ये भाजपला मिळालेल्या यशामुळे शेअर बाजार गुरुवारी चांगलाच जोशात होता. सेन्सेक्सने सुरूवातीच्या सत्रातच तब्बल 1500 अंकांची उसळी घेतली होती. चार राज्यात भाजपला मिळालेल्या यशाचे परिणाम शेअर बाजारावर सकारात्मक दिसले. सरतेशेवटी सेन्सेक्स निर्देशांक 817 अंकांच्या वाढीसह 55,464 तर निफ्टी निर्देशांक 249 अंकांच्या वाढीसह 16,594 अंकांवर बंद झाला. सकाळी 1595 अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स निर्देशांक खुला झाला होता. सलग तिसऱया सत्रात तेजीमुळे गुंतवणूकदारांचे भांडवल 10.83 लाख कोटींनी वाढले आहे. गेल्या तीन दिवसात सेन्सेक्स 2 हजार 621 अंकांनी चढला असल्याचेही स्पष्ट झाले आहे. सुचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 10 लाख 83 हजार 103 कोटी रुपयांनी वाढून 2 कोटी 51 लाख 93 हजार 934 कोटी रुपयांवर पोहचले आहे.
Previous Articleद. आफ्रिकेचा पाकिस्तानविरुद्ध निसटता विजय
Next Article बेअरस्टोच्या नाबाद शतकाने इंग्लंड सुस्थितीत
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.