बेळगाव
उत्तर भागातील भारतीय जनता पार्टी प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन संकल्प गार्डन कणबर्गी रोड बेळगाव येथे राज्य सरकारचे विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. शहर परिसरातील नऊ किलोमिटर अंतरातील भाजप कार्यकर्त्यांनी या प्रशिक्षण वर्गाला उपस्थिती दर्शवली होती. या कार्यक्रमाला उत्तर विभागाचे आमदार अनिल बेनके, उत्तर विभाग मंडळाचे अध्यक्ष पांडूरंग धामणेकर, राज्य सेक्रेटरी उज्ज्वला बडवानाचे, राज्य अल्पसंख्यांक अभिवृद्धी अध्यक्ष मुक्तार पठान, राज्य ओबीसी सेक्रेटरी किरण जाधव, दीपा कुडची, बुडा अध्यक्ष धुळाप्पा होसमनी, माजी महानगराध्यक्ष राजेंद्र हरकुणी, बेळगाव महानगर जिल्हा जनरल सेक्रेटरी दादागौडा बिरादार, मृगेंद्र गावडा-पाटील, बेळगाव उत्तरचे जनरल सेक्रेटरी विजय कडगनूर यांसह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते. सदर प्रशिक्षणवर्ग दोन दिवस चालणार असून सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.