कोरोनाच्या पार्शवभूमी वर भाजपचा लोकोपयोगी उपक्रम
कोल्हापूर / प्रतिनिधी
सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर घरगुती विद्युत उपकरणे बिघडली असतांना दुरूस्तीकरून मिळणारी दुकानं अजून खुली नसल्याने व तशात उन्हाची तीव्रता अधिक जाणवू लागल्याने पंखे, कुलर या सारखी व इतर घरगुती वापराची उपकरणं विनामुल्य दुरुस्ती शिबिर राबवण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव व भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या उपस्थितीत डायना कॅसल येथे पार पडले.
यावेळी बोलताना महेश जाधव म्हणाले, ज्या पद्धतीने महापुराच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष लोकांच्या पाठीशी उभा राहिला. त्याचं पद्धतीने याही वेळेस या महामारीच्या संकटकाळी सर्वांनी एकत्र येऊन लोकांना मदत करूया. तसेच राहुल चिकोङे म्हणाले, अशोक देसाई यांनी उपनगरात हा आगळा वेगळा उपक्रम राबवलत तो खुप चांगला व खऱ्या अर्थाने लोकोपयोगी आहे व अशा वेळी गरजू व गरीबांना आपण अन्नधान्य पुरवठा, तत्सम गोष्टींचा पुरवठा करावा. सोशल डिस्टन्सिंग व स्वतःची काळजी घ्यावी. अशोक देसाई म्हणाले, आमचे नेते भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चद़कातं पाटील याच्या मार्गदर्शनाखाली व प .महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, राहुल चिकोङे याच्या सहकार्याने लॅकङाउन संपेपर्यंत स्वखर्चाने मोफत दुरुस्ती शिबीर चालणार असून, या शिबिराचे नियोजन अशोक देसाई व वल्लभ देसाई वरिपेरिंगसाठी बहुमोल्य सहकार्य राजेंद बुधले, महादेव खोराटे यांचे लाभत आहे. तसेच यावेळी नाना पाटील नगर ङायना कॅसल परिसरात मास्क व सेनिटायझर वाटप केले. हे शिबिर 1 मे ते 7 मे पर्यंत चालू राहणार आहे तरी भागातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अशोक देसाई यांनी केले आजच्या दिवशी सुमारे 130 लोकांनी नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. या काय॔क़मास राजू मोरे, अमोल माने, सचिन जाधव रवींद घाटगे सर सचिन सुतार ,व भागातील नागरिक उपस्थित होते