बेंगळूर/प्रतिनिधी
बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याबाबत गुरुवारी बेंगळूर येथे भाष्य केलं. “२५ जुलैला हायकमांडकडून मला नोटीस मिळणार आहे. त्यानुसार मी पुढचा निर्णय घेईन. पक्ष मजबूत करणे आणि पुढील निवडणुकांमध्ये पक्षाला पुन्हा सत्तेत आणणे, या दृष्टीने माझी पुढची वाटचाल असेल. तसेच भाजप उच्च कमांडच्या निर्णयाचे मी पालन करीन असे म्हंटले होते. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या संकेतानंतर कर्नाटकचे कॉंग्रेसचे विधानसभेचे नेते सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला बी. एस. येडियुरप्पा यांचा संभाव्य उत्तराधिकारी म्हणून दलित नेत्याचा विचार करण्याची विनंती केली.
कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या म्हणाले की, “जर नलिनकुमार कटील आणि भाजपला दलितांविषयी चिंता असेल तर येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतरत्यांनी कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री म्हणून दलित नेत्याची निवड करावी. ” असे म्हंटले आहे.
मंगळूर येथे पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या यांनी, “सामाजिक न्यायाविषयी खूप बोलणारी व्यक्ती म्हणून त्यांनी (नलिनकुमार कटील) तत्काळ मुख्यमंत्री म्हणून दलित नेत्याची नेमणूक करण्यासाठी त्वरित पावले उचलली पाहिजेत,” असे ते म्हणाले.