प्रतिनिधी/सातारा
भाजपा ओबीसी मोर्चा सातारा जिल्हा कार्यकारणी, मंडल अध्यक्ष व पदाधिकारी यांची आढावा बैठक शासकीय विश्रामगृहात जिल्हाध्यक्ष ऍड. विशाल शेजवळ यांच्या अध्यक्षतेखाली व पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख वीणा सोनवलकर, प्रदेश उपाध्यक्ष अप्पासाहेब देशमुख, प्रदेश चिटणीस अनुप सूर्यवंशी, निखिल झगडे, बाळासाहेब यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. महेंद्र कदम यांनी आभार मानले. यावेळी जिल्हाउपाध्यक्ष संदीप दीक्षित, नवीन नियुक्त मंडल अध्यक्ष कराड उत्तर सुनील दळवी, मंडल अध्यक्ष वाई जगताप, चिटणीस चिंचकर, उपाध्यक्ष सूर्यकांत पानस्कर, गौरव पवार, विक्रम पवार, सूर्यकांत गोरे, अमोल भुजबळ, भूषण शेजवळ व अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थितीत होते.