पंढरपूर / प्रतिनिधी
पदवीधर निवडणुकीच्या मतदान केंद्रामध्ये प्रवेश केल्याप्रकरणी भाजपा खा. जयसिध्देश्वर महास्वामी यांच्यावर प्रभाव टाकल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीकडून निवडणूक आयोगाकडे आक्षेप नौंदवण्यात आला होता.
पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठीचे मंगळवारी मतदान झाले. यावेळी पंढरपूरातील द.ह.कवठेकर प्रशालेमध्ये असणाऱ्या मतदान केंद्रांमध्ये थेट भाजपा खा. जयसिध्देश्वर महास्वामी यांनी शिरकाव केला होता. प्रसंगी राष्ट्रवादीचे शहरअध्यक्ष संदिप मांडवे यांनी आक्षेप नोंदवला.
प्रत्यक्षात मतदान केंद्रामध्ये मतदार, निवडणुक प्रतिनिधी, उमेदवार प्रतिनिधी यांच्याशिवार इतर लोक शिरकाव करू शकत नाहीत. असा नियम आहे. त्यानुसार पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी यांच्यावर मतदारांवर प्रभाव टाकला प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.