प्रदेश भाजपतर्फे प्रकाराचा निषेध
प्रतिनिधी /पणजी
मुरगाव मतदारसंघांमध्ये निवडणूक आयोगाची कायदेशीर परवानगी घेऊन प्रचार करणाऱया भारतीय जनता पक्षाच्या प्रचार वाहनाला मुरगाव मतदारसंघातील सात ते आठ काँग्रेस कार्यकर्त्यानी अडवून त्यावरील भाजपा नेत्यांच्या छायाचित्रांना काळे फासले. त्याचबरोबर एलईडी स्रीनचीही तोडफोड केली. चालकाचा मोबाईल फोडून टाकला. हा प्रकार म्हणजे काँग्रेस पक्षाने आपली हार निवडणुकीपूर्वी मान्य केली असून त्यामुळे ते सैरभैर झाले आहेत व कायदा हातात घेऊन राजकीय हिंसाचार करण्याचा प्रकार आहे. या प्रकाराविरुद्ध मुरगाव पोलिसात तक्रार नोंद करण्यात आली आहे. या प्रकाराचा प्रदेश भाजपतर्फे आम्ही निषेध करत आहोत .असे प्रतिपादन
मुरगाव मतदारसंघाचे भाजपाचे अध्यक्ष संजय सातार्डेकर यांनी आज केले. पणजी येथील भाजपच्या प्रचार कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सातार्डेकर बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेश सचिव सर्वानंद भगत व सोशल मिडिया प्रमुख रुपेश कामत उपस्थित होते.
यावेळी सातार्डेकर यांनी सांगितले की निवडणूक आयोगाची कायदेशीर परवानगी घेऊन भाजपने प्रचारासाठी वाहने अर्थात रथ तयार केले आहेत. ते विविध ठिकाणी फिरतात . हे वाहन मुरगाव मतदारसंघात आल्यानंतर काँग्रेसच्या तथाकथित कार्यकर्त्यांनी ते अडवले व त्यांनी वाहनाला काळे फासले. तसेच भाजपच्या नेत्यांच्या चित्रानाही काळे फासले. काँग्रेसच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना काही तक्रार होती तर त्यांनी निवडणूक आयोगाला कळवणे गरजेचे होते. कायदा हातात घेऊन त्यांनी आपले हिंसक राजकारण दर्शवले असून भाजपाने केलेल्या विकासकामांमुळे पुन्हा एकदा गोव्यात भाजपाचे सरकार सत्तेवर येणार आहे. हे जाणून आपला पराभव होणार असल्याने मानसिक संतुलन बिघडवून काँग्रेसने हा हल्ला केल्याची टीका सातार्डेकर यांनी यावेळी केली. या प्रकारानंतर भाजपाचे कार्यकर्ते घटनास्थळी आले असता हल्लेखोर पळून गेले. त्यांच्यात जर हिंमत होती तर त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांचा सामना करणे गरजेचे होते. या भित्र्या हल्लेखोरावर कारवाई व्हावी यासाठी पोलीस स्थानकात तक्रार नोंद केली आहे. तसेच निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करण्यात येणार असल्याचे सातार्डेकर यांनी यावेळी सांगितले .
दरम्यान गोवा फॉरवर्डचे प्रदेश अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई हे वारंवार सावंत आडनावाच्या व्यक्तीवर टीका करत आहेत . आम्हांला सावंतवाडीचे सरकार नको .अशी उपहासात्मक टीका त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या आडनावाचा आधार घेत केली आहे. विजय सरदेसाई यांना सावंत आडनावाचा एवढा तिटकारा का ? हे त्यांनी स्पष्ट करणे गरजेचे असून मुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांचे वडील , आजोबा या सगळय़ांचा जन्म गोव्यात पाळी येथे झालेला असताना वारंवार त्यांना सावंतवाडीचे म्हणून चिडवणे चुकीचे आहे . महत्त्वाचे म्हणजे गोवा फॉरवर्डने दोनच उमेदवार जाहीर केले आहेत आणि त्यातील एका उमेदवाराचे आडनाव सावंत आहे. मग विजय सरदेसाई यांना ते सावंत कसे चालतात. याचा खुलासा सरदेसाई यांनी करावा .अशी मागणी यावेळी रुपेश कामत यांनी केली. सावंत आडनावाचे गोव्यामध्ये हजारो निज गोयकार आहेत आणि या सर्व सावंत आडनावाच्या व्यक्तींचा विजय सरदेसाई वारंवार अपमान करत आहेत. त्याना सावंत आडनावांच्या व्यक्तींची मते नको असतील तर त्यांनी तसे स्पष्टपणे जाहीर करावे .असेही कामत यावेळी म्हणाले . काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डची युती करून सुद्धा भरपूर विकास केलेल्या भाजपाला हरवने त्यांना शक्मय होणार नाही व पुन्हा एकदा भाजपाचे सरकार गोव्यात येणार आहे याची जाणीव झाल्यामुळेच विजय सरदेसाई काहीच्या काही बरळत असल्याची टीका करून त्यांच्या या टीकेला मतदारांनी योग्य ते उत्तर द्यावे .असे आवाहन कामत यांनी यावेळी केले. आडनावावरुन टीका करण्याच्या या प्रकाराची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात येणार असल्याचेही कामत यांनी यावेळी सांगितले. मयेचे उमेदवार संतोष कुमार सावंत यांनीही याबाबत काय तो खुलासा करावा. असे सांगून
मुख्यमंत्री सावंत आणि त्यांचे पूर्वज गोव्यात जन्मलेले आहेत.मात्र विजय सरदेसाई हे परदेशात जन्माला आले आहेत .असा खुलासा याप्रसंगी कामत यांनी केला .
मुरगाव काँग्रेस हल्ला प्रकरणी योग्य तो पोलिस तपास व्हावा व निवडणूक आयोगाकडून कारवारी व्हावी यासाठी भाजप शक्मय ते सर्व प्रयत्न करत असल्याचे यावेळी उपस्थित भाजपाचे प्रदेश सचिव सर्वानंद भगत यांनी सांगितले.