सांगली / प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्ते पदी सांगलीतील ज्येष्ठ नगरसेवक मुन्ना कुरणे यांची निवड झाली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी कुरणे यांना निवडीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ आमदार सुरेश खाडे आमदार गोपीचंद पडळकर माजी आमदार नितीन शिंदे दिनकर पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख शहर जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे मकरंद देशपांडे शेखर इनामदार महापौर गीता सुतार जि. प. अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्यासह आजी माजी नगरसेवक कार्यकर्ते उपस्थित होते कुरणे हे माजी नगरसेवक असून महापालिकेत त्यांनी गेली वीस वर्षे नगरसेवक म्हणून काम केले आहे. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासह बॉक्सिंग असोसिएशन ईदगाह कमिटी अशा विविध संस्थावर ते कार्यरत आह