सपत्नीक मंगेशी येथील श्री मंगेश देवस्थानला भेट
प्रतिनिधी /फोंडा
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मंगेशी येथील श्री मंगेश देवस्थानला काल रविवारी सकाळी 8.30 च्या सुमारास भेट घेतली. दोन दिवसाच्या गोवा भेटीत सपत्नीक देवदर्शन घेत श्री मंगेश देवाचे आशिर्वाद घेतले. गोव्याची संस्कृती व आदारतिर्थ्याने ते भारावून गेले.
यावेळी त्याच्यासमवेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री खासदार श्रीपाद नाईक, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, पक्षाचे गोवा प्रभारी सी.टी राव, भाजपा गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटन मंत्री सतीश धेंड, एनआरआय आयुक्त ऍड. नरेंद्र सावईकर, फोडय़ाचे नगरसेवक विश्वनाथ दळवी, प्रियोळ भाजपा अध्यक्ष महेश शिलकर, संदीप निगळय़े, गजानन प्रभू, काशिनाथ गावडे, महेश भोमकर, दिगंबर तारी तसेच प्रियोळ भाजपा गट समितीचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
विधानसभा निवडणूकीला अवघ्या सहा महिने शिल्लक असताना मंत्री, आमदारांशी महत्वाची बैठकीसाठी ते दोन दिवसाच्या गोवा भेटीवर आहे. यावेळी मडकई भाजपा गटाचे पदाधिकारी सुदेश भिंगी यांनीही इतर समर्थकासह नड्डा यांच्यांशी भेट घेतल्याने राजकीय समीकरणे तीव्र झाली असून शनिवारी मंत्री गोविंद गावडे यांनीही चड्डा यांच्याशी चर्चा केल्यानंतर मगो-भाजपा युतीसंबंधीही कोणता पवित्रा घेतात यावर सर्व फोंडावासियांचे लक्ष लागून राहिले आहे. मंदिर भेटीनंतर ते तपोभूमी कुंडई येथे स्वामी ब्रह्मेशानंदजीची सदिच्छा भेट घेत आशिर्वाद घेतला. येथे वृक्षरोपण कार्यक्रम आटोपल्यानंतर ते पणजी डॉन बॉस्को येथील लसीकरण कार्यक्रमासाठी रवाना झाले.