शिवसेनेचे जितेश कामत यांचा आरोप
प्रतिनिधी /पणजी
साहाय्यक परिचारिका मिडव्हाईव्ज म्हणून ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात काम करतात. साहाय्यक परिचारिका या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमासाठी काम करतात. परंतु कोरोना काळात त्यांनी आयझोलेशन सेंटर, लसीकरण कार्यक्रम, स्वॅब चाचणीचे काम केले आहे. परंतु 2007 ते आतापर्यंत मागणी पूर्ण केली नाही. भाजपा सरकारने या परिचारिकांकडे दुर्लक्ष केले आहे असा आरोप शिवसेना गोवा प्रमुख जितेश कामत यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.
साहाय्यक परिचारिकांना सातवा वेतन आयोग्य सोडाच ते पाचवा वेतन आयोगाचे नूतनीकरण केलेले नाही. काँग्रेस सरकार काळात आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे आरोग्यमंत्री होते आणि आताही आरोग्यमंत्री आहेत. त्यावेळी त्यांनी पे स्कॅल नाकारली तर त्यांच्यावर अन्याय होईल असे विश्वजित राणे यांनी सांगितले होते. परंतु अजूनही या परिचारिकांवर अन्याय होत आहे जितेश कामत यांनी पणजीत केला.
केंद्रीय वेतन आयोगातर्फे सरकारी कर्मचाऱयांना सातवे वेतन आयोग लागू करण्यात आले असूनसुद्धा गोवा सरकारकडून साहाय्यक नर्स ( Auxiliary Nurse Midwives) सुधारीत पगार देण्यात येत नाही हे अन्यायकारक आहे. पाचव्या वेतन आयोगातर्फे शिफारस अर्थ खात्याच्या एनीबॉली समितीने फेटाळून लावली आहे. ANM सहाय्यक नर्सना द्वितीय श्रेणीतून चौथ्या श्रेणीत बढती मिळण्यापासून वंचित ठेवले जात आहे. दहावी पास पॅरा मेडिकल कर्मचाऱयांचे ग्रेड पे 2400 रूपये असून दहावी नंतर दीड वर्षांचे प्रशिक्षण घेतलेल्या किंवा दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सहाय्यक नर्सच्या 1900 रुपयांपेक्षा जास्त आहे. सरकार दरबारी 2007 पासून वेतन वाढ प्रलंबित आहे. सहाय्यक नर्स यांच्याकडून जेव्हा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेण्यात आली तेव्हा त्यांनी सवयी प्रमाणे पूर्ण जबाबदारी आरोग्य संचालनालयावर ढकलून हात झटकले असा आरोप शिवसेना गोवा राज्य प्रमुख जितेश कामत यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
गोवा वगळता देशातील इतर राज्यात आणि गोव्यातील केंद्रीय ईस्पितळातील सहाय्यक नर्सना सुधारीत ग्रेड पे लागू केलेला आहे मग केवळ गोवा सरकारकडून उपेक्षा का केली जात आहे, असा सवाल कामत यांनी विचारला आहे.
सहाय्यक नर्सना स्वतःच्या समस्येवर वाचा फोडण्यासाठी संघटन पाहिजे असून त्यांची असोसिएशनसाठीची मागणी खात्याने प्रलंबित ठेवली आहे. टेंड नर्सिंग असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून त्यांना समस्या सोडवणे कठीण पडत असून गोव्यासाठी नवीन असोसिएशन बनवण्यासाठी आरोग्य खात्याने तातडीने त्यांना मंजुरी देण्याची मागणी कामत यांनी केली आहे.
शिवसेना राज्य प्रमुख जितेश कामत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आरोग्य प्रशासकीय संचालक मारीया सिवोमारा डीसुझा यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले आहे. सोबत उत्तर जिल्हा प्रमुख सुशांत पावसकर, उपराज्यप्रमुख सुभाष केरकर, सचिव मंदार पार्सेकर, मुरगाव तालुका प्रमुख दिपक येरम, तिसवाडी तालुका प्रमुख महेश पेडणेकर, फोंडा तालुका प्रमुख अखिल नाईक, कामगार समन्वयक दामोदर वेरेकर, राजा आणि इतर शिवसैनिक हजर होते. मुरगाव तालुका प्रमुख दिपक येरम, फोंडा तालुका प्रमुख अखिल नाईक, कामगार समन्वयक दामोदर वेरेकर पत्रकार परिषदेस हजर होते.