प्रतिनिधी / पणजी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुशीत वाढलेला भारतीय जनता पक्ष हा अल्पसंख्याक लोकांच्या विरोधात असून केवळ काँग्रेस अल्पसंख्याकाचा रक्षणकर्ता आहे. असे काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या अल्का लंबा यांनी सांगितले. अल्पसंख्याकाच्या विरोधात भाजपने आखलेले कुटील डाव सफल करण्याचे काम आपचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल करीत आहे. दिल्लीतील चर्च केजरीवाल यांनी जारी केलेल्या आदेशावरूनच पाडण्यात आली हे त्याचे स्पष्ट उदाहरण आहे असेही लांबा यांनी सांगितले.
काल गुरुवारी येथील काँग्रेस हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत अल्का लांबा बोलत होत्या यावेळी त्यांच्या सोबत ट्रोजन डिमेलो, रॉयला फर्नांडिस, श्रध्दा खलप व देवसुरबी यदुवंशी उपस्थित होत्या. देशात कोरोना सारख्या महासंकटाने थैमान घातले असताना देशातील प्रत्येक मुख्यमंत्री आपल्या राज्यातील परिस्थितीला सामोरे जाण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र दिल्लीचे मुख्यमंत्री अरवींद केजरीवाल भाजपाचे दलाल बनून देशभरात फिरत आहे. आप ही भाजपाची बी टीम आहे. येणाऱया विधानसभा निवडणुकीत भाजप व काँग्रेस अशी सरळ लढत होणार असून केवळ मतांची विभागणी व्हावी म्हणून भाजपच आपला सहकार्य करीत असल्याचे लांभा यांनी सांगितले.
केजरीवाल यांनी आपची उद्दिष्टे खुटींला लटकविली
दिल्लीतील कित्येक कुटुंबे मोफत विजेचा वापर करीत असून गोव्यातही मोफत विज दिली जाणार असल्याची आश्वासन म्हणजे केजरीवाल यांची आश्वसने म्हणजे केवळ गाजर असून गोमंतकीय जनतेने त्याला बळी बडू नये. विजेबाबत दिल्लीत काय स्थिती आहे ती दिल्लीवासीयांनाच माहिती आहे. दिल्लीतील विजेची स्थिती मांडताना लांबा यांनी पत्रकारांना दिल्लीतील विजबिलेही दाखविली. कोविड काळात आरोग्य व्यवस्था सारखी नसल्याने कित्येक लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत लोक पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करीत आहेत. हे सांगताना त्यांनी दिल्लीतील वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातम्या दाखविल्या. दिल्लीत सरकारी कर्मचाऱयांना पगार देण्यासाठी केजरीवाल सरकारकडे पैसे नाही ही आजची सत्यता आहे. केजरीवाल मात्र ज्या राज्यात जातात तिथे मोफतपणाचे गाजर दाखवित आहेत. असेही लांबा यांनी सांगितले, जे उद्दिष्ट समोर ठेवून दिल्लीत आप तयार झाला होता ती सर्व उद्दिष्टे केजरीवाल यांनी खुंटीला लटकविली आहे. म्हणून डोक्यावरची टोपी गायब झाली. केवळ मतदार तयार करण्यासाठी दिल्लीवाल्याना मोफतपणाचे गाजर दाखविले त्यामुळे दिल्लीत परप्रांतीयांचा भरणा झाला. आज अनेकांनी चांगल्या नेत्यांनी आप सोडला आहे. असेही लांबा यांनी सांगितले.
गोवा प्रयोगशाळा करू देऊ नका दिल्लीवाल्याना फसवून केजरीवाल यांनी सत्ता मिळविली आता गोमंतकीयांना फसविण्याचा प्रयत्न करीत आहे. देशातील विविध राज्यात फसवेगिरीचा प्रयोग करून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. गोव्याला गोव्याचे असे वेगळेपण आहे. गोवा शांतप्रिय प्रदेश असून विविध जातीजमातीचे लोक आनंदाने राहत आहेत. अशा प्रदेशात केजरीवाल यांची राजकारणाची प्रयोगशाळा करू देऊ नका. असेही लांबा यांनी सांगितले.