ऑनलाईन टिम / नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शनिवारी अहमदाबाद शहरातील रोड शो ला गुजरातच्या लोकांना आम आदमी पक्षाला (आप) राज्यावर राज्य करण्यासाठी “एक संधी” देण्याचे आवाहन केल्यानंतर सुरुवात केली.
भाजपशासित राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीकडे लक्ष वेधून आप नेत्यांनी शहरातील एका मंदिरात खोडियार मातेचा आशीर्वाद घेउन सजवलेल्या ट्रकवरून शहरातील 2 किमीचा रोड शो केला.
25 वर्षे राज्यात सत्तेत राहिल्यानंतर भाजप “अहंकाराने भरलेला” असून, जनतेने त्यांच्याही पक्षाला “एक संधी” द्यावी असे अरविंद केजरीवाल यांनी “तिरंगा गौरव यात्रा” रोड शो सुरू होण्यापूर्वी सांगितले.
केजरीवाल आणि मान यांच्यासोबत गुजरातमधील आपचे नेते इसुदान गढवी आणि गोपाल इटालिया होते. “दिल्ली आणि पंजाबनंतर आता आम्ही गुजरातसाठी तयार आहोत,” असे पंजाबचे मुख्यमंत्री मान म्हणाले. केजरीवाल म्हणाले की, आपला राजकारण कसे करावे हे माहित नाही, परंतु भ्रष्टाचार कसा संपवायचा हे माहित आहे. दिल्लीत आम्ही भ्रष्टाचार संपवला, पंजाबमध्ये भगवंत मान यांनी दहा दिवसांत भ्रष्टाचार संपवला,”