प्रतिनिधी /म्हापसा
भगव्या पक्षाला पंचायत क्षेत्राच्या विकासात रस नाही हे लक्षात आल्याने तिने भाजपची छावणी सोडून स्थानिक आमदार रोहन खंवटे यांच्या मार्गदर्शनाखालील पॅनलशी हात मिळवणी करण्याचा निर्णय घेतल्याचे सुकूर पंचायत सदस्य डितोसा लोबो यांनी सांगितले.
लोबो खंवटे गटात सामील होणारे नवीन पंच सदस्य बनले ज्यांनी सरपंच संदीप वझरकर यांना हटवून अनिल पेडणेकर यांची अध्यक्षपदी निवड केली. यापूर्वी भाजपशी संलग्न असलेले सुकूर पंच सदस्य संजय मांजरेकर यांनी खंवटे गटाची बाजू बदलली होती. माझ्या प्रभागाच्या विकासासाठी वझरकर काम करतील या विचाराने मी त्यांना पाठिंबा दिला होता. अखेर मी चुकीची सिद्ध झाली. असे लोबो यांनी पर्वरी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
वझरकर यांना विकासात रस नाही म्हणून त्यांना खुर्चीवरून हटविण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. लोबो यांनी निदर्शनास आणून दिले की वाडे ते सुकूर चर्च या रस्त्याच्या हॉटमिक्सींगच्या फीलला तीन महिन्यांपूर्वी मंजुरी देण्यात आली होती. परंतु वारंवार विनंती करुनही वझरकर यांनी ते मंजूर केले नाही. त्या म्हल्ल्या की, सुकूरमध्ये गेल्या अडीच वर्षात कोणताही विकास झालेला नाही आणि खेळाच्या मैदानासारख्या मूलभूत सुविधा वझरकर पूर्ण करू शकले नाहीत.