शनिवारी कार्यकारीणीची बैठक होणार
प्रतिनिधी/ बेळगाव
भाजप कोअरकमिटी व राज्य कार्यकारीणीची बैठक बेळगावात होणार आहे. शुक्रवारी 4 डिसेंबर रोजी कोअरकमिटीची तर शनिवारी 5 डिसेंबर रोजी राज्य कार्यकारीणीची बैठक होणार असून यासाठी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्यासह अनेक वरि÷ नेते बेळगावला येत आहेत.
भाजपचे राज्य प्रभारी अरुण सिंग हे प्रथमच कर्नाटक दौऱयावर येत आहेत. एकीकडे मंत्रीमंडळ विस्तार, नेतृत्व बदलावर जोरदार चर्चा सुरू असताना पक्षाचे प्रभारी अरुण सिंग व मुख्यमंत्री येडियुराप्पा हे एकत्र येणार आहेत. दोन दिवस भाजपचे अनेक वरि÷ नेते बेळगावात राहणार आहेत.
मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा भाजप प्रदेशाध्यक्ष नळीनकुमार कटील, उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ, सी. टी. रवी, महसुलमंत्री आर. अशोक, केंद्रिय मंत्री प्रल्हाद जोशी आदींसह राज्यातील अनेक नेते बेळगावात दाखल होणार आहेत. मंत्रीमंडळ विस्तार किंवा पुनर्रचने बरोबरच अनेक महत्वांच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्मयता आहे.
केंद्रिय मंत्री सुरेश अंगडी यांच्या अकाली निधनामुळे बेळगाव लोकसभा मतदार संघासाठी कोणाला उमेदवारी द्यायची या विषयीही चर्चा होणार आहे. बेळगाव लोकसभा, बसवकल्याण व मस्की विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात उमेदवार ठरविण्यासाठीही या बैठकीत चर्चा होणार असून कोअरकमिटीत काय ठरणार याकडे इच्छुकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.