ऑनलाईन टीम / मुंबई :
माजी खासदार आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासह त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांनी स्वत: याबाबत ट्विट करत माहिती दिली. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, मी आणि माझी पत्नी डॉ. मेधा सोमय्या आम्हां दोघांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या रुग्णालयात आमच्यावर उपचार सुरु आहेत.
किरीट सोमय्या हे मुलुंड येथे राहतात. हा भाग जुलै महिन्यात कोविड हॉटस्पॉट होता. मात्र, हा भाग आता नियंत्रणात आला आहे. कोरोनाच्या काळात देखील सोमय्या सक्रिय होते. त्यांनी सरकारी रुग्णालयातील अपुऱ्या सोयी सुविधा, दुरव्यास्था यासारख्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली होती. मात्र, सतत बाहेर फिरत असल्याने त्यांना कोरोनाची बाधा झाली असल्याची शक्यता आहे.