मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन
सांगे/ प्रतिनिधी
स्वयमपूर्ण गोवा ही सकल्पना सत्यात उतरण्यांसाठी निवडून येणारा नगरसेवक हा भाजप पुरस्कृत असला पाहिजे. त्यासाठी सांगे नगरपालिका निवडणुकित भाजप पुरस्कृत उमेदवाराना निवडून द्या असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगे येथील निवडक कार्यकर्ते व उमेदवाराच्या समर्थकासमोर बोलताना केले.
सांगे नगरपालिका क्षेत्रात साधन सुविधा निर्माण करण्याचे काम भाजप सरकाने केले. पालिकेची प्रशस्त प्रसासकीय इमारत भाजप सरकारने उभी केली. खास करून दुकानदाराचे भाडे माफ करण्याचा निर्णय घेतला. पूर्वीचे नगराधक्ष आणि पालिका मंडळाने योग्यवेळी भाडे वादविण्याचा निर्णय घेतला असता तर आज भाडे भरमसाठ वाढले नसते त्यामुळे यात दुकान दारांचा दोष नाही. आपण त्यांना दिलासा दिल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.
आपले सरकार सबका विकास… सबका विश्वास या नजरेतून पाहत आहे. आपण दूरदष्टी डोळय़ासमोर ठेऊन कार्य करीत आहे. मनुशाचा विकास झाला पाहिजे. गोवा मुक्तीची 60 वर्षे साजरी करताना गोमंतकीय माणूस मूलभूत गरजेपासून वंचित राहता कामा नये असे मी मानतो असे मुख्यामंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
सरकारची हर एक योजना राबविण्यासाठी लोकप्रतिनिधीची गरज असून यापूर्वी जिल्हा पंचायत त्यानंतर महानगर व महापालिका निवडणूकित यश संपादन केल्या नंतर आत्ता राहिलेल्या नगरपालिकात भाजपच जिकणार असे ते म्हणाले.
पालिका निवडणुकीत मतदारांनी अल्प फायदा न पाहता दीर्घ कालीन फायदा पाहून मतदान करण्याचे आवाहन मुख्यामंत्र्यांनी केले. आपण गेल्या दोन महिन्यात तीन हजार नोकऱयासाठी जाहिराती दिल्या असून डिसेंबर 21पर्यंत सात हजार नोकऱ्यच्या जागा भरतील. गोवेकरांचे प्रश्न सोडण्यादाठी आपले सरकार भांदिल असून फास्ट ट्रक वरती गोवा भूमी अधिकारिता योजनेतर्गत जमीन नावावर करण्याबरोबर घराना क्रमांक दिला जाणार आहे असेही मुख्यामंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
सांगे हा भाजपचा मतदार संघ असून येथिल मतदार हा भाजपवर विश्वास ठेवणारा आहे. 2022 च्या निवडणुकीत सांगेतून भाजपच जिकणार असा विश्वास व्यक्त करून नगर पालिका निवडणुकीत भाजप पुरस्कृत उमेदवारांना निवडून आणूया असे आवाहन केले.
सरकार जे चांगले काम करीत आहे. त्याचे प्रत्यय निवडणुकीच्या निकालावरून दिसून येते. लोकं सरकार बरोबर आहे हे जिल्ला पंचायत, महानगर पालिका व नगरपालिकेच्या निकालावरून स्पस्ट झाले आहे असे ऍड. नरेंद्र सावईकर यांनी सांगितले. स्थिर आणि विकासासाठी सांगे नगरपालिकेची सत्ता भाजपकडे द्या. कार्यकर्त्यांना पक्ष पुरस्कृत उमेदवार कोण हे माहित आहे. सांगेवासीय भाजप बरोबर राहिलेले आहे. 2017 ला काय झाले ते विसरूनही गेले आहे. डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत त्त्वाखाली काम करण्यासाठी भाजप पुरस्कृत उमेदवारांना निवडून द्या, त्याकरता काम करा असे आवाहन ऍड. सावईकर यांनी केले.
माजी आमदार वासुदेव गावकर व सुभाष फलदेसाई यांनी आपल्या भाषणात पक्ष पुरस्कृत उमेदवारना निवडून देण्याचे आवाहन केले. मंडळ अध्यक्ष नवनाथ नाईक व जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर यांची भाषणे झाली. राजेश गावकर यांनी सूत्रसंचालन तर सुदेश भंडारी यांनी आभार मानले. तत्पूर्वी मुख्यामंत्री डॉ. सावंत यांनी तेमचोवाडा येथे दहाही भाजप पुरस्कृत उमेदवारांची भेट घेतील व संवाद साधला.