बेंगळूर/प्रतिनिधी
भाजपचे प्रदेश प्रभारी अरुण सिंह हे कर्नाटक दौऱ्यावर असून ते आज पक्षातील नेत्यांची बैठक घेणार आहेत. दरम्यान आज अरुण सिंह बेंगळूर येथील कुमार कृपा अतिथीगृहात दाखल झाले असून ते राज्यमंत्री उमेश कत्ती, के. सी. नारायण गौडा, शशिकला जोल्ले आणि कोटा श्रीनिवास पुजारी यांची बैठक घेणार आहेत.
कर्नाटकचे प्रभारी राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग हे तीन दिवसांच्या राज्य दौर्यावर आहेत. तसेच अरुण सिंग हे पक्षांतर्गत सुरु असलेल्या कलहाविषयी विषयी माहिती घेतील. तसेच ते नाराज आमदार आणि मंत्री यांच्याशीही चर्चा करतील. दरम्यान, राज्यात नेतृत्व बदलाबाबत पक्षातील नेत्यांनी विधाने केली होती. परंतु काही दिवसापूर्वी अरुण सिंग यांनी पक्षात कोणताही बदल केला जाणार नसल्याचे म्हणत मुख्यमंत्री म्हणून येडियुरप्पा कायम राहतील असे म्हंटले होते.