ऑनलाईन टीम/तरुण भारत
देशात पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. आज पंजाबमध्ये ११७ जागांसाठी तर उत्तर प्रदेशात तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. दरम्यान, पंजाबमध्ये काँग्रेस तर उत्तर प्रदेशात भाजप सत्तेत आहे. भाजप आणि काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. उत्तर प्रदेशात तिसऱ्या टप्प्यात ५९ जागांसाठी मतदान होत असून आज उत्तर प्रदेशात मंत्री सतिश महाना यांची कानपूरमधील एका मतदान केंद्रावर सीआरपीएफ जवानाशी वादावादी झाली आहे.
दरम्यान पंजाबमध्ये काँग्रेस तर उत्तर प्रदेशात भाजप सत्ताधीश आहे. पंजाबमध्ये साधारणपणे सकाळी आठ ते सायंकाळी सहादरम्यान तर उत्तरप्रदेशात सकाळी सात ते सायंकाळी सहादरम्यान मतदान होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सर्व ठिकाणची मतमोजणी १० मार्च रोजी पार पडेल. उत्तर प्रदेशात मंत्री सतिश महाना यांची कानपूरमधील एका मतदान केंद्रावर सीआरपीएफ जवानाशी झटापट झाली. कार्यकर्त्यांनी आरोप केला की, सीआरपीएफ पोलिसाने गोळीबार केला. यावर मंत्र्यांनी जावून जवानाला इशारा दिला. बराच काळ दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.