प्रतिनिधी/ रत्नागिरी
रानपाट गोनबरेवाडीमधील वृध्द महिलेचा 90 टक्के भाजल्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल़ा गंगाबाई सखाराम कळंबटे (70, ऱा गोणबरेवाडी रानपाट, रत्नागिरी) असे मृत झालेल्या वृध्देचे नाव आह़े ही घटना मंगळवार 19 रोजी सायंकाळी 6.15 च्या सुमारास घडल़ी
याबद्दलची खबर श्रीकांत सखाराम कळंबटे (53, ऱा गोणबरेवाडी रानपाट, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात दिल़ी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी खबर देणारे श्रीकांत कळंबटे हे शेतवार कामास गेले असता त्यांची आई गंगाबाई कळंबटे ही भाजल्याचे चुलत भावाने सांगितल़े दरम्यान त्यांना तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल़े उपचारादरम्यान जवळपास 90 टक्के भाजल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल़ा या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आह़े