प्रतिनिधी/ बेळगाव
शनिवारी भाजी बाजाराचा आढावा घेतला असता मार्केडयार्ड येथील भाजीमार्केट मध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्याने दर उतरले असल्याचे दिसून आले. परिणामी किरकोळ भाजीपाल्याच्या विक्रीवर देखील याचा परिणाम झाला असून जानेवारी महिन्यात पुर्ण महिनाभर भाज्यांचे दर कमीच असल्याचे दिसून आले.
शनिवारी दहा किलोचा दर विचारात घेतला असता, भेंडी 300 ते 350 रु, गवारी 300 ते 320 रु, दाडकी 300 ते 350, कारले 250 ते 300, बिन्स 300 रु, वाटाणा 320 ते 350 रु, मिरची 300 रु, वांगी 200 ते 220, टोमॅटो 100 ते 120 रु, ढबू मिरची 250 ते 300 असा दर होता. तर पालेभाज्यांचे दर देखील शेकडा कांदा पात 400 रु, पालक 300 रु, लाल भजी 300,मेथी 500 रु, शेपू 400 ते 500, कोंथिबिरी 600 ते 700 असा असल्याचे दिसून आले.
यंदा भाजीपाल्याच्या दरात मोठया प्रमाणात वाढ झाली नसल्याने हिरवागार भाजीपाला नागरिकांना सहज उपलब्ध होत आहे. मटार, गाजर, वांगी, सोले, हरभरा यांचे दर देखील कमी आहेत. यामुळे संक्रांतीच्या निमित्ताने चवीने चाखल्या जाणाऱया ऋतुनिहाय भाजीपाला देखील स्वस्तात मिळत आहे.