वांगी, वरण ढबू भेंडी दोडका 80 रुपये प्रतिकिलो, कोथंबीरची पेंडी 50 रुपये
प्रतिनिधी/कोल्हापूर
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घाऊक व्यापाऱयांनी दसरा सणाच्या सांगतेच्या पार्श्वभूमीवर गर्दी केली होती. बहुतांश पालेभज्यांचे दर तेजीत राहिले .भाजी पाल्याचे दर कमी होतील अशी आशा असताना दर वाढत राहिल्याचे लक्ष्मीपुरी बाजारपेठेतील व्यापाऱयांनी सांगितले. सणाच्या निमित्ताने गतआठवडÎात तेलाचे दर कमी होत असल्याने गृहिणीमधून समाधान व्यक्त होत होते. रविवारी आठवडी बाजारामध्ये भाज्यांसह फळांचे दर स्थिर राहिले आहेत. पालेभाज्यांचे दर मात्र चढेच होते. यामध्ये मेथीचा दर 20 रुपये पेंडी होती. 30 रुपयाला मिळणारी कोथंबीरच्या पेंडीचे दर कडाडले असून एक पेंडी 50 रुपयाला झाली आहे.
मार्केट यार्डात फळांची मोठया प्रमाणात आवक झाली असून दर स्थिर राहिले आहेत. सिमला आणि कन्नूर सफरचंदाची आवक सुरुच आहे. फळांचे दर प्रतिकिलो प्रमाणे ः सफरचंद 100 ते 130 रुपये , डाळींब 140 रुपये, सीताफळ 70 ते 80 रुपये, चिकू 80 रुपये , पेरु 80 ते 100 रुपये,मोसंबी 60 ते 70 रुपये, संत्री 60 ते 70 रुपये, केळी जवारी40 रुपये तर देशी 30 रुपये डझन आहे.
बाजारात पालेभाज्यांचे दर स्थिर राहिले आहेत. यामध्ये कोणतीच घसरण झालेली नाही. पालेभाज्यांचे दर प्रतिकिलो प्रमाणे ः वांगी80 रुपये, दोडका 70 ते 80 रुपये, भेंडी 70 ते 80रुपये, टोमॅटो 60रुपये, कोबी 60 ते 80रुपये, फ्लॉवर 60 ते 80रुपये, काकडी 40रुपये, घेवडा 80रुपये, वरणा 80रुपये, ढबु 80रुपये, हिरव्या मिरच्या 40रुपये, कारली 40रुपये, गवारी 80 ते 100रुपये, पोकळा 15 रुपये पेंडी, मेथी 20 रुपये पेंडी, शेपू व पालक 15 रुपये पेंडी, मुळा एक जोडी 15 रुपये, कोथंबीर 50 रुपये पेंडी, दुधी 15 ते 20, लाल व पांढरा कांदा प्रतिकिलो 40 रुपये, बटाटे प्रतिकिलो 20 ते 25 रुपये, आले प्रतिकिलो 60 रुपये, लसूण प्रतिकिलो 70 ते 80 रुपये तर रताळ 30 ते 50 रुपये प्रतिकिलोने विक्री होत होती.
नवरात्रोत्सवात खाऊची पाने, मोठया प्रमाणात विकली जातात. यंदा खाऊच्या पानांचा दर स्थिर राहिला. खाऊची पाने शेकडा आकारानुसरा 20 ते 40 रुपये दिले जातात. तर लाल सुपारी प्रतिकिलो 660 तर पांढरी सुपारी 580 रुपये प्रतिकिलो विकली जात आहे.
कडधान्याचे दर स्थिर राहिले आहेत. कडधान्याचे दर प्रतिकिलो प्रमाणे- हरभरा डाळ 70 ते 76 रुपये, मसूर 92 तेड 100 रुपये, खोबरे 160 ते 240रुपये, मूग 96 ते 110रुपये, पोहे 40 ते 48 रुपये , शेंगदाणे 100 ते 130 रुपये आहे.
झेंडूचा दर अपटला…
दसऱयामध्ये झेंडूच्या फुलांना चांगलीच मागणी असते.दसऱयाच्या सणावर झेंडू फुलांची मोठया प्रमाणात आवक कमी झाल्याने या फुलांना चांगला दर मिळाला. मात्र दसरा सणाची सांगता झाल्याने दर खाली आला आहे. सध्या 40 ते 50 रुपये दराने याची विक्री सुरु आहे. झेंडूच्या दराला यंदा अपेक्षित दर मिळाला नसल्याचे व्यापाऱयांनी सांगीतले.दसऱयानंतरचा दिवाळी हा मोठा सण असतो. या सणाची आता फुल व्यापाऱयांना प्रतिक्षा आहे. शहरातील फुल बाजारात पश्चिम पन्हाळÎातील कळे-सावर्डे, करवीरमधील मुडशिंगी,कांडगाव, राशिवडे,शिरोळ, हातकणंगले परिसरातून झेंडू येतो.दसऱयात या फुलांच्या दरात चढ उतार होत होते.रंगानुसार झेंडुंच्या फुलांना दर मिळत होता. यामध्ये भगवा झेंडू 15 ते 45, पिवळा झेंडू 10 ते 30 दराने विक्री केली जात आहे. दसरा सणाच सांगता झाल्याने बाजारात झेंडू फुलांचे व्यापारी फारसे दिसत नव्हते.