महात्मा फुले गल्ली वडगाव येथील सुप्रिया पवार यांचे कौतुक
प्रतिनिधी / बेळगाव
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे 32 मण सुवर्णसिंहासन उभारले जाणार आहे. यासाठी सर्वच स्तरातून आपल्याला शक्मय असेल तितका निधी जमा केला जात आहे. वडगावच्या एका मुलीने भाजी विक्री करून कमाविलेला पैसा आपल्या लग्नाचे औचित्य साधून सुवर्ण सिंहासनासाठी कर्तव्य निधी म्हणून दिला आहे. तिने दिलेल्या कर्तव्य निधीमुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महात्मा फुले गल्ली, येळ्ळूर रोड वडगाव येथील सुप्रिया शरद पवार ही पदवीधर असून भाग्यनगर परिसरात भाजी विक्री करते. आपणही फूल ना फुलाची पाकळी म्हणून कमाविलेल्या पैशातून सुवर्ण सिंहासनासाठी निधी द्यावा, हा विचार तिच्या मनात होता. या विचारातूनच तिने पैसे जमविण्यास सुरुवात केली. नुकतेच तिचे लग्न मासगौंडहट्टी (धामणे) येथील सतीश मेलगे यांच्याशी झाले. लग्नाचे औचित्य साधून तिने 5 हजार रुपयांचा निधी सुवर्ण सिंहासनासाठी दिला.
कर्तव्य निधी स्वीकारून जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांनी तिचे कौतुक केले. ते म्हणाले, सुवर्ण सिंहासनासाठी जगभरातून निधी जमा होत आहे. परंतु सुप्रिया यांनी आपल्या मेहनतीतून जमा केलेला पैसा सुवर्ण सिंहासनासाठी देऊन एक वेगळा आदर्श निर्माण केला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी युवराज पाटील, मंगेश हरिदा, उदय शिंदे, विनय कोकितकर यांच्यासह धारकरी उपस्थित होते.
हरिष बाळेकुंद्री यांच्याकडून 5 हजार रुपयांचा निधी
विष्णू गल्ली वडगाव येथील हरिष हणमंत बाळेकुंद्री यांनी आपल्या बहिणीच्या विवाहाचे औचित्य साधून सुवर्ण सिंहासनासाठी कर्तव्यनिधी दिला. त्यांनी 5 हजार रुपयांचा निधी जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांच्याकडे सुपूर्द केला.