प्रतिनिधी/ सातारा
स्वातंत्र्यसैनिक नगरात यापुर्वी मुंबईहून एक युवक काही तास राहिल्याने मायक्रो कंटेटमेंट झोन झाला होता. त्यानंतर तो परिसर मायक्रो कंटटेंमट झोन शिथील झाला होता. तो रुग्णही ठणठणीत बरा झाला. परंतु नव्यानेच याच स्वातंत्र्यसैनिक नगरात रहाणारे भाजी विक्रेते हे पत्नीच्या उपचारासाठी दि.24 रोजी कोल्हापूरला एका दवाखान्यात गेले होते. तेथून आल्यानंतर दि.28 पासून घसा खवखवण्याबरोबर इतर त्रास जाणवू लागला. त्यांनी सुरुवातीला मेडिकलच्या गोळय़ा घेतल्या. परंतु त्रास कमी होत नसल्याने लगेच उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्या स्वाबचा अहवाल दि.30 रोजी रात्री उशीरा पॉझिटीव्ह आला. त्यामुळे त्या भाजी मंडईत जाणारे सातारकर धास्तावले आहेत.
सातारा शहराले यापूर्वीचे 22 कोरोना बाधित रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने शहर कोरोनामुक्त झाले होते. तसेच रविवार पेठेतील स्वातंत्र्य सैनिक नगरातही यापूर्वी मुंबई येथून येवून काही तास राहिलेला युवकास कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे तो परिसर मायक्रो कंटेटमेंट झोन करण्यात आला होता. तो रुग्णही बरा होवून मायक्रो कंटेटमेंट झोन शिथील करण्यात आला होता. आता पुन्हा नव्याने तेथील स्थानिक असलेल्या भाजी विक्रेत्यासच कोरोनाची बाधा झाली आहे. येथील स्थानिक असलेले भाजी विक्रेते हे स्वातंत्र्यसैनिक नगरात आपल्या कुटुंबासमवेत राहतात. तब्येतीने ठणठणीत असणारे हे भाजी विक्रेते आपल्या पत्नीसमवेत व्यवसाय करतात. त्यांच्या पत्नीला मधूमेहाचे उपचार कोल्हापूर येथील एका दवाखान्याचे सुरु आहेत. त्यांच्या उपचाराकरता ते दोघेच दि.24 रोजी कोल्हापूर येथे गेले होते. उपचार करुन परत आल्यानंतर दि. 28 रोजी त्यांना घशात खवखवणे, थोडासा ताप अशी लक्षणे जाणवू लागली. त्यांनी त्याच परिसरातील सुरुवातीला मेडिकलच्या गोळय़ा घेतल्या. तरीही काहीच कमी येत नसल्याने संशय नको म्हणून त्यांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. त्यांचा स्वाब दि.29 रोजी घेतला होता. दि.30 रोजी स्वाबचा अहवाल आला अन् स्वाबचा अहवाल आल्यानंतर धक्काच बसला. त्यांनी आपले दुकानही कोल्हापूरला जाण्याच्या अगोदर सुरु केले नव्हते. ते कोणाच्या संपर्कात आले नव्हते. तरीही जे पोवई नाका भाजी मंडई परिसरात भाजी आणण्यासाठी जातात ते सातारकर धास्तावले आहेत. त्यांना कोरोना झाल्याचे समजताच सातारा पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांना प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सुचना दिल्या. त्यानुसार गोरे यांच्या सुचनेनुसार कोरोना कक्ष अधिकारी प्रणव पवार यांनी त्या भागाचा सर्व्हे करुन घेतला. मायक्रो कंटेटमेंट झोन पुन्हा करण्याचे काम सुरु होते. त्यांच्या संपर्कात आलेले त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना विलिनीकरण कक्षात ठेवले असून त्यांचेही स्वाब तपासण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.