जिवंत राहण्यासाठी महिला खाते चिकन
स्वतःच्या जीवनात भाज्या आणि फळे न खाण्याचा विचारही सामान्य लोकांना करवत नाही. पण ब्रिटनमधील शार्लेट व्हिटलने स्वतःच्या जीवनात भाज्य आणि फळांपासून नेहमीच अंतर राखले आहे. भाज्या खाणे तर दूरची गोष्ट राहिली, तिचा एक्स्ट्रीम फूड फोबिया तिच्या सामाजिक जीवनातही अडचणी निर्माण करत आहे.
शार्लेटच्या फूड फोबियाची तीव्रता इतकी अधिक आहे की ती सुपरमार्केट जवळून जात असताना भाज्यांकडे पाहू देखील शकत नाही. ब्रोक्ली किंवा हिरव्या भाज्या पाहिल्यावरच तिच्या शरीराला घाम फुटू लागतो. तिने बालपणातच भाज्या खाणे सोडून दिले होते. मागील अनेक वर्षांपासून ती केवळ भात आणि चिकनवर जगत आहे. हिरव्या भाज्या खाण्याचा विचार मनात येताच तिला उलटय़ा होऊ लागतात.
बालपणापासून फोबिया
बालपणी भाज्या खात नसल्याने आईवडिल मला उपाशी राहशील असे सांगायचे. फळ-भाज्या खाण्याचा प्रयत्न केला तरीही उलटय़ा होऊ लागायच्या. हळूहळू सॉस, सूप आणि विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांमुळेही फोबिया होऊ लागला. मग आई मला हॉटडॉग, चिकन नगेट्स आणि फिश फिंगर्स यासारख्या गोष्टी खायला देऊ लागली. शाळेत लंचवेळी मी रडायचे. 18 व्या वर्षी नोकरीसाठी घराबाहेर पडल्यावर अनेक अडचणींना सामोरे जावे लागले, यामुळे माझे सामाजिक जीवनही प्रभावित झाल्याचे शार्लेट सांगते.
डेटिंगपासून दूर
अन्न चुकीच्या तापमानावर मिळाल्यास किंवा चुकीच्या पद्धतीने वाढले तरीही त्रास होतो. स्वतःच्या या फोबियामुळे मागील 10 वर्षांपासून सिंगल आहे. कारण डेटिंगसाठी सोबत जेवणासाठी जावे लागते आणि मी तसे करू शकत नसल्याचे तिने म्हटले आहे. तिचा फूड फोबिया वाढतच चालला आहे. मागील अनेक वर्षांपासून ती केवळ चिकन नगेट्स आणि राइस केक खात आहे. पेशाने घोडेस्वार प्रशिक्षक असलेल्या शार्लेटला पुरेसे पोषण मिळत नाही. सर्वसामान्य लोकांप्रमाणे मित्रांसोबत लंच किंवा डिनर करणे तिच्यासाठी एखाद्या स्वप्नासारखे आहे.