क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
गजाननराव भातकांडे स्कूलतर्फे मंगळूर अल्वाज येथे झालेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत बेळगावच्या श्वेता जाधवने रौप्यपदक पटकाविल्याबद्दल तिचा गौरव करण्यात आला. मंगळूर येथील अल्वाज महाविद्यालय येथे झालेल्या कर्नाटक राज्य वेटलिफ्टिंग संघटना आयोजित राज्यस्तरीय युवा, कनिष्ट व वरिष्ट वेटलिफ्टिंग स्पर्धेत जीएसएसच्या श्वेता जाधव हिने 49 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकाविल्याबद्दल गजाननराव भातकांडे इंग्लिश मिडियम स्कूल येथे तिचा खास गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे, मुख्याध्यापिका सुवर्णा खन्नूकर, मरिया रोझारिओ, क्रीडाशिक्षक मॅथ्यू लोबो यांच्या उपस्थितीत श्वेताला 4 हजार रु. रोख, भेटवस्तू, पुष्पगुच्छ व शाल देऊन तिचा गौरव करण्यात आला.