सीएसमटी स्थानकातील पूल उद्यापासून 25 फेब्रुवारीपर्यंत बंद
ऑनलाईन टीम / मुंबई :
दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि भायखळा रेल्वे स्थानकातील पादचारी पूल आजपासून बंद ठेवण्यात येणार आहेत.
भायखळा रेल्वे स्थानकातील पूल आजपासून (दि. 7) 6 मार्चपर्यंत तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकातील पूल उद्यापासून (दि.8) 25 फेब्रुवारीपर्यंत बंद असणार आहे.
भायखळा पुलाची दुरूस्ती दोन टप्प्यात होणार आहे. कल्याणच्या बाजुच्या प्लॅटफॉर्म 1,2,3 व 4 ला जोडणाऱया पादचारी पुलांचे काम करण्यात येणार आहे. सुरूवातीला प्लॅटफॉर्म क्रमांक 3 व 4 चे काम पूर्ण केले जाईल, त्यानंतर 1 व 2 चे काम करण्यात येणार आहे. तर सीएसमटी स्थानकाच्या प्लॅटफॉर्म 6 आणि 7 च्या पादचारी पुलांच्या दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी पर्यायी पुलांचा वापर करावा, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.