ढाका : भारताच्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या महिला फुटबॉल संघाने यू-19 सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये सलग दुसरा विजय नेंदवताना भुतानवर 3-0 अशी एकतर्फी मात केली. सुमती कुमारीने सातव्या मिनिटाला भारताला आघाडीवर नेले. त्यानंतर 41 व 53 व्या मिनिटाला प्रियांगका देवीने दोन गोल नोंदवत भारताची आघाडी 3-0 अशी केली.
भारताने या सामन्यावर प्रारंभापासूनच पूर्ण वर्चस्व गाजवले. सातव्या मिनिटाला अमिशा बक्सलाने उजव्या बाजूने दिलेल्या क्रॉस पासवर सुमतीने पहिला गोल केला. भुतानला भारतीय क्षेत्रापर्यंत एकदाही मुसंडी मारता आली नाही. त्यामुळे भारतीयावर फारसे दडपणच आले नाही.
मिडफील्डमध्ये प्रियांगका देवीने चमकदार प्रदर्शन घडविताना काही कॉर्नर्सच्या संधी निर्माण करून दिल्या. भारताने यापुढेही आक्रमण चालूच ठेवले आणि लवकरच त्यांना कॉर्नरवर दुसरे यशही मिळाले होते.