कनिष्ठ गटातील हॉकी विश्वचषक स्पर्धा
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या विद्यमाने येथे सुरू असलेल्या कनि÷ पुरुष विश्वचषक हॉकी स्पर्धेत यजमान भारताचा आज (शनिवार दि. 27) पोलंडविरुद्ध साखळी सामना होत आहे. या सामन्यात विजय संपादन करुन उपांत्य स्पर्धेत स्थान निश्चित करण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
यापूर्वी ब गटातील सामन्यात कॅनडाचा 13-1 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला. या प्रति÷sच्या स्पर्धेत यजमान भारताच्या कनि÷ हॉकी संघाला गेल्या बुधवारी फ्रान्सबरोबरच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. या पहिल्या सामन्यात फ्रान्सने भारतावर 5-4 अशा गोलफरकाने निसटता विजय मिळविला होता.
ब गटात कॅनडाविरुद्ध दुसऱया साखळी सामन्यात भारतीय संघाने आक्रमक आणि वेगवान खेळावर अधिक भर देत गोलांचा पाऊस पाडला. या सामन्यात भारताने 13 गोल नोंदविले. कॅनडाला केवळ एका गोलावर समाधान मानावे लागले. शनिवारच्या सामन्यात भारताने पोलंडचा पराभव केला तर उपांत्यपूर्व फेरीत त्यांच्यासमोर बलाढय़ बेल्जियमचे आव्हान असू शकेल.