वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतात बनलेल्या पहिल्यावहिल्या मोटरसायकलचे लाँचिंग येत्या ऑक्टोबरमध्ये होणार असल्याचे ‘वन इलेक्ट्रीक मोटरसायकल्स’कडून समजते. क्रीडन असे या नव्या मोटरसायकलचे नाव असून तिची चाचणी सध्या सुरू आहे.
या गाडीचा पुरवठा येत्या ऑक्टोबरमध्ये सुरु होणार असून विविध विपेत्यांकडे ही नवी मोटरसायकल उपलब्ध केली जाणार आहे. या गाडीच्या प्री-बुकिंगला दिल्ली एनसीआर, बेंगळूर, चेन्नई, हैदराबाद या ठिकाणी सुरुवात झाली आहे. विक्री करता किंवा व्यवसायाकरता कंपनी इतरांशी भागीदारी करण्याचाही विचार करते आहे.95 किलोमीटर प्रतितास इतका वेग घेणारी ही गाडी सुरुवातीला भारतात विक्रीकरता उपलब्ध होणार आहे. सध्याची सर्वात वेगवान आणि ताकतवान भारतीय इलेक्ट्रीक मोटरसायकल असल्याचा दावा कंपनीने केला आहे. वन इलेक्ट्रीक मोटरसायकल्स या कंपनीची ही मोटरसायकल आहे.