दुसऱया टी-20 सामन्यात 7 गडी राखून एकतर्फी बाजी
इंदोर / वृत्तसंस्था
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने पहिली टी-20 लढत जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. लंकेने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर निर्धारित 20 षटकात 9 बाद 142 धावा केल्या तर प्रत्युत्तरात भारताने 17.3 षटकात तीन गडय़ांच्या बदल्यातच विजयाचे लक्ष गाठले.
विजयासाठी 143 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केएल राहुल व शिखर धवन या जोडीने 9.1 षटकात 71 धावांची सलामी दिली. केएल राहुलने 32 चेंडूत 6 चौकारांसह 45 धावा जमविल्या तर डावखुऱया शिखर धवनने 29 चेंडूत 2 चौकारांसह 32 धावांचे योगदान दिले.
तिसऱया स्थानावरील श्रेयस अय्यरने 26 चेंडूत 34 धावा जमवल्या. त्याच्या खेळीत तीन चौकार व एका षटकारांचा समावेश राहिला. कर्णधार विराट कोहली (17 चेंडूत नाबाद 30) व ऋषभ पंत (1 चेंडूत नाबाद 1) या जोडीने विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. विराट कोहलीने लहिरु कुमाराच्या गोलंदाजीवर शानदार षटकार खेचत विजयावर शिक्कामोर्तब करून दिले.
लंका फलंदाजीत अपयशी
तत्पूर्वी प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर श्रीलंकेच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. कुशल परेराने 28 चेंडूत सर्वाधिक 34 धावांचे योगदान दिले. सलामीवीर गुणतिलकाने 20 तर ओशॅदो फर्नांडोने 22 धावांचे योगदान दिले.
याशिवाय फर्नांडो, धनंजया व हसरंगा यांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. ठराविक अंतराने गडी बाद होत राहिल्याने लंकेच्या प्रयत्नावर नेहमी मर्यादा राहिल्या. गोलंदाजीच्या आघाडीवर शार्दुल ठाकुर सर्वात किफायतशीर ठरला. त्याने 4 षटकांत 23 गावांमध्ये 3 बळी घेतले. याशिवाय नवदीप सैनीने 4 षटकात 18 धावात 2 बळी घेतले.
कुलदीप यादवने 4 षटकात 38 धावात 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. चार महिन्यानंतर पुनरागमन करत असलेला जसप्रीत बुमराहचे पृथक्करण 4 षटकांत 32 धावा व एक बळी असे राहिले. वॉशिंग्टन सुंदरनेही ही 29 धावात 1 बळी घेतला. उभय संघातील तिसरी व शेवटची टी-20 दि. 10 रोजी होईल.
धावफलक
श्रीलंका : दनुष्का गुणतिलका त्रि. गो. सैनी 20 (21 चेंडूत 3 चौकार), अविष्का फर्नांडो झे. सैनी, गो. वॉशिंग्टन सुंदर 22 (16 चेंडूत 5 चौकारांसह 22), कुशल परेरा झे. धवन, गो. कुलदीप 34 (28 चेंडू), ओशॅदो फर्नांडो यष्टीचीत पंत, गो. कुलदीप 10 (9 चेंडूत 1 चौकार), भानुका राजपक्ष झे. पंत, गो. सैनी 9 (12 चेंडूत 1 चौकार), दसून शनाका त्रि. गो. बुमराह 7 (8 चेंडू), धनंजया डीसिल्वा झे. दुबे, गो. ठाकुर 17 (13 चेंडूत 2 चौकार), वणिंदू हसरंगा नाबाद 16 (10 चेंडूत 3 चौकार), इसुरु उदणा झे. सैनी, गो. ठाकुर 1 (2 चेंडू), लसिथ मलिंगा झे. कुलदीप, गो. ठाकुर 0 (1 चेंडू), लहिरु कुमारा नाबाद 0 (0 चेंडू). अवांतर 6. एकूण 20 षटकात 9 बाद 142.
गडी बाद होण्याचा क्रम
1-38 (अविष्का फर्नांडो, 4.5), 2-54 (गुणतिलका, 7.4), 3-82 (ओशॅदो, 11.3), 4-97 (कुशल, 13.2), 5-104 (राजपक्ष, 14.5), 6-117 (शनाका, 16.6), 7-128 (धनंजया, 18.2), 8-130 (उदणा, 18.5), 9-130 (मलिंगा, 18.6).
गोलंदाजी
बुमराह 4-0-32-1, शार्दुल ठाकुर 4-0-23-3, नवदीप सैनी 4-0-18-2, वॉशिंग्टन सुंदर 4-0-29-1, कुलदीप यादव 4-0-38-2.
भारत : केएल राहुल त्रि. गो. हसरंगा 45 (32 चेंडूत 6 चौकार), शिखर धवन पायचीत गो. हसरंगा 32 (29 चेंडूत 2 चौकार), श्रेयस अय्यर झे. शनाका, गो. कुमारा 34 (26 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), विराट कोहली नाबाद 30 (17 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), ऋषभ पंत नाबाद 1 (1 चेंडू). अवांतर 2. एकूण 17.3 षटकात 3 बाद 144.
गडी बाद होण्याचा क्रम
1-71 (केएल राहुल, 9.1), 2-86 (शिखर, 11.2), 3-137 (श्रेयस, 17.1).
गोलंदाजी
लसिथ मलिंगा 4-0-41-0, कुमारा 3.3-0-30-1, धनंजया 2-0-15-0, शनाका 4-0-26-0, वणिंदू हसरंगा 4-0-30-2.