एआयएसटीएची माहिती : ऑक्टोबर-एप्रिलमधील आकडेवारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
साखर कारखान्यांनी 1 ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या विपणन वर्ष 2021-22 मध्ये आतापर्यंत 58.10 लाख टन साखर निर्यात केली आहे, अशी माहिती अखिल भारतीय साखर व्यापारी संघ (एआयएसटीए) यांनी दिली आहे. यातील जवळपास 6 लाख टन साखर सध्या निर्यातीच्या प्रवासात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
यामधील कारखान्यांनी विपणन वर्ष 202-22 मध्ये आतापर्यंत विना सरकारी सबसिडीच्या 74 लाख टन साखरेची निर्यात करण्याकरीता करार करण्यात आला आहे. एआयएसटीएच्या माहितीनुसार साखर कारखान्यांनी वर्ष 2021 च्या ऑक्टोबरपासून एप्रिलपर्यंत एकूण 58.10 लाख टन साखर निर्यात केल्याची माहिती आहे. यातील 49.60 लाख टन साखर कारखाने आणि व्यापारी निर्यातदारांनी थेट निर्यात केली आहे.
निर्यातीदरम्यान अडचणी
साखर निर्यातीसाठी रेल्वेमध्ये गव्हाला प्राधान्य दिले जात असून ज्यामध्ये साखर निर्यात करताना काही प्रमाणात अडचणी निर्माण होत असल्याचे एआयएसटीएचे अध्यक्ष प्रफुल्ल विठलानी यांनी सांगितले आहे.