मार्च 2022 मध्ये वर्षाच्या आधारे चार टक्क्यांची वाढ ः आयबीएमची माहिती
नवी दिल्ली
देशातील खनिज उत्पादनात मार्च 2022 मध्ये वर्षाच्या आधारे चार टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती खाण मंत्रालयाने दिली आहे. मंत्रालयाच्या माहितीनुसार खाण आणि त्याच्याशी संलग्न असणाऱया क्षेत्राचा खनिज उत्पादनाचा निर्देशांक 144.6 वर राहिला आहे. मार्च 2021 च्या तुलनेत चार टक्के अधिक उत्पादन झाले आहे.
खाण मंत्रालयाने म्हटले आहे, की भारतीय खाण ब्यूरो(आयबीएम) यांनी सुरुवातीच्या आकडेवारीत एप्रिल व मार्च 2021-22 या कालावधीत खनिज उत्पादनात मागील वर्षातील समान कालावधीच्या तुलनेत 12.2 टक्के इतकी वृद्धी नोंदवली गेली आहे.