ऑनलाईन टीम / मणिपूर :
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारे माजी बॉक्सर डिंको सिंग यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डिंको सिंग यांचा रविवारी रिपोर्ट मिळाला त्यात ते कोरोना पॉझिटिव असल्याचे निष्पन्न झाले. 41 वर्षीय डिंको सिंग यांना यकृताचा कॅन्सर झाला होता. मार्च मध्ये त्यांच्यावर दिल्लीत रेडिएशन थेरपी चे उपचार केले जाणार होते. त्यासाठी त्यांना दिल्लीला नेण्यात आले होते. मात्र, लॉक डाऊनमुळे उपचाराची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. वैद्यकीय उपचारांनंतर ते पुन्हा मणिपूरला आले होते. सध्या ते कॅन्सरशी लढत असताना असताना आता कोरोनाची बाधा झाली आहे.
जेव्हा ते मणिपुर मध्ये आले तेव्हा त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. जेव्हा ते मागील आठवड्यात दिल्लीमध्ये होते, तेव्हा तेथील नर्स कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र डिंको सिंग यांचे रिपोर्ट निगेटिव्ह होते. डिंको सिंग यांना ॲम्बुलन्स मधून येताना कोरोनाची बाधा झाली असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, डिंको सिंग यांनी 1998 मध्ये बँकॉक मध्ये खेळल्या गेलेल्या आशियाई स्पर्धेत भारताकडून सुवर्णपदक पटकावले होते.