ऍपलसह गुगलला टक्कर देणार : विविध टप्प्यावर करणार काम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऍपल आणि अल्फाबेटची कंपनी गुगलवर अवलंबत्व कमी करण्यासाठी भारत आपले स्वतःचे ऍप सादर करण्याची योजना आखत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार स्वत:चे ऍप स्टोअर तयार करणार असल्याचे सांगण्यात येते.
अँड्रॉईडची भारतात 97 टक्के हिस्सेदारी आहे. यामध्ये सरकारला हस्तक्षेप करावा लागणार असून भारतीय स्टार्टअप्सची मदत घ्यावी लागणार असल्याची माहिती आहे. यामध्ये गुगल किंवा ऍपल यांच्यासारखे ऍपल स्टोअर उभारण्यासाठी 30 टक्के फि घ्यावी लागणार नाही. सदर योजनेच्या अंतर्गत सरकार अँड्राईड फोनमध्ये ऍप्सला प्री इंस्टॉल करण्याचे अनिवार्य बनविणार असल्याची माहिती आहे. गुगल, ऍपलला यायोगे टक्कर दिली जाणार आहे.
गुगलसोबत वाद
गुगल आणि भारतीय स्टार्टअप्समधील अनेक वाद समोर आले आहेत. गुगलने पेटीएमच्या नंतर फूड डिलिव्हरी सेवेतील कंपनी झोमॅटो आणि स्वीगीला नोटीस दिली आहे. त्यांचा आरोप आहे, की त्यांनी गेमिंग फिचर्ससह अन्य कटकटी निर्माण केल्याची माहिती आहे.