नवी दिल्ली : दुबईमध्ये सुरू असलेल्या एएसबीसी आशियाई युवा आणि कनिष्ठांच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या वंशज आणि प्रीती यांच्यासह सहा स्पर्धकांनी आपल्या वजन गटातून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.
या स्पर्धेच्या सहाव्या दिवशी वंशजने पुरूषांच्या 64 किलो वजन गटातील उपांत्य लढतीत इराणच्या फरिदी अबोलफझीचा 5-0 अशा गुणांनी एकतर्फी पराभव करून अंतिम फेरीत स्थान मिळविले. युवा मुलांच्या 80 किलो वजन गटात भारताचे विशालने उपांत्य लढतीत कझाकस्तानच्या मेमीरवर विजय मिळविला. महिलांच्या विभागात प्रीती दहीया (60 किलो), सिमरन वर्मा (52 किलो), स्नेहाकुमारी (66 किलो) यांनीही अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. प्रीती दहीयाने आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर उपांत्य लढतीत एकतर्फी मात केली तर 57 किलो वजन गटात प्रीतीने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.